मोठा वाघोद्यात गॅस्ट्रो सदृश आजाराचे नवीन ११ रुग्ण आढळले, रुग्ण संख्या ३८ वर, आरोग्य यंत्रणा अलर्ड मोडवर
सावदा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मोठा वाघोदा येथे दूषित पाणी व अती तापमानात गॅस्ट्रो सदृश आजाराचे रुग्ण आढळलेल्या मोठा वाघोदा गावात रावेर तहसीलदार बी.ए.कापसे यांनी भेट देऊन पाहणी केली व आरोग्य विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनास आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सुचना दिल्या* मोठा वाघोदा येथील गॅस्ट्रो सदृश आजाराच्या धर्तीवर ग्रामपंचायत प्रशासना तर्फे लिकेज व भूमिगत नळ शोधण्याचे काम सुरू आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचार्याचे पथक रुग्ण शोधून संपर्क साधत तपासणी करीत उपचारार्थ चिनावल येथील सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या पीएचसी मध्ये दाखल आहेत.
दि.२१ मे रोजी सावदा येथील खाजगी दवाखान्यात २१ व निंभोरा पी एस सी चे उपकेंद्र येथे ६ संक्रमित रुग्ण दाखल झाले होते डॉ सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये १) राधा रामदास सखाराम बोधडे वय ४१ वर्षे २) रितेश युवराज आढाळे २०वर्ष ३) शरीफ कदिर तडवी ३० वर्ष ४) खुशाल कडू बेलदार ३५ वर्ष ५) अरुण माधव कचरे ५० वर्ष डॉ अजित पाटील यांच्या दवाखान्यात ६) प्रमोद समाधान तायडे वय १९ वर्षे ७) आम्रपाली भीमराव वाघ वय १८ वर्ष ८) जानवी भीमराव वाघ १५वर्ष ९) तक्ष दीपक वाघ वय २ वर्षं ६ महिने १०) पल्लवी राहुल वाघ ३० वर्ष ११) कल्पना सुपडू वाघ ५५ वर्ष १२) अश्वजा नरेंद्र वाघ१० वर्ष मोठा वाघोदा उपकेंद्रात १३) कमलाकर सुपडू भालेराव४१ १४) आरिफा नामदार तडवी ३५ वर्ष १५) रेखा सुपडू वाघ ४० वर्ष १६) कुमार नानू सुपे १७) आरीफा इस्माईल तडवी २० वर्ष १८) रेखा सुपडू वाघ वय 40 वर्ष १९) तैय्यब सुभान तडवी २६ वर्ष निंभोरा पीएचसीत २०) जुबेदा नत्थु तडवी ५० २१)जोहरा सुभान तडवी ५० वर्ष २२) हाजर सुभान तडवी २३ ) मुस्कान मुबारक तडवी १६ २४)साबिया मुळा तडवी१५ २५)कविता राहुल भालेराव२० २६)सिमरन भीमराव वाघ१७ २७) श्रेया विशाल ससाने २७ वर्ष अशा रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर काही रुग्णांना किरकोळ लक्षणे असल्याने औषधोपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.
तर दि २२ रोजी विकी सुभाष महाजन ज्योती नटवर वाघ मल्लक बशीर मल्लक रियाज हुंबरे खान आसिफ खान मुबतसरा सय्यद फारुख फुदाबाई रशी तडवी मंगला खुशाल मंडळे कमल रतन डोळे शाहीन न्याजोदिन तडवी अकिला हसन तडवी अनिकेत राहुल सुरवाडे असे ११ गॅस्ट्रो रुग्ण चिनावल येथील पीएचसी मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहेत.
वैद्यकीय अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तपासणी दरम्यान भुमिगत जमीनलेवल वरील नळ तपासणी केली तसेच दूषित पाणी पुरवठा पाईप लाईन लिकेज शोधून जोडण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी मोठा वाघोदा प्राथमिक आरोग्य केंद्र व चिनावल येथील पीएचसी दवाखान्यात तळ ठोकून हजर आहेत संक्रमित रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आज जळगांव जिल्हा परिषद चे सिईओ मुख्यकार्यकारी अधिकारी मोठा वाघोदा येथे भेट देऊन पाहणी करणार आहेत मात्र साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस अशी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. डॉ अजय रिंढे तालुका वैद्यकिय अधिकारी संक्रमित परिसरात रुग्ण शोध मोहीम सुरू केली आहे व ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी आणणेकामी संक्रमित परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. डॉ चंदन पाटील वैद्यकीय अधिकारी निंभोरा – गॅस्ट्रो सदृश आजाराचे लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी निंभोरा व चिनावल येथील पीएचसी आरोग्य केंद्रात सोयीसुविधा व उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे लक्षणे जाणवताच आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल व्हावे असे आवाहन त्यांनी केले.