राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी प्रा.सुनिल नेवे यांचे सर्व पक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन !
भुसावळ (प्रतिनिधी) । जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तालुक्यातील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे हलविण्याची मंजुरी देण्यात आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट आहे. प्रशिक्षण केंद्र दुसऱ्या जिल्हात गेल्याने जळगाव जिल्हावर मोठा अन्याय झाला आहे. या संदर्भात भुसावळ येथे भाजपने जिल्हा संघटक प्रा.डॉ. सुनिल नेवे यांनी लोणारी मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत सर्वांनी राजकिय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे भावनिक आवाहन केले आहे.
सत्ताधारी व विरोधक एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करीत आहे. राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर येथे हलविल्याने विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यावर टिका करीत सावकारे हे अकार्यक्षम आमदार असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रकार परीषदेत म्हटले होते. त्यांना प्रतिउत्तर देत भाजपाचे जिल्हा संघटक प्रा. डॉ. सुनिल नेवे यांनी आमदार संजय सावकारे हेच कार्यक्षम आमदार असल्याचा दावा करीत त्यांनी राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी किती प्रयत्न केले याचा खुलासा केला.
प्रा. पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले ,भाजपानेते स्व.गोपीनाथ मुंडे व माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्याहस्ते पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भुमीपुजन झाले होते. पण २००४ ते २००९ च्या दरम्यान माणिकराव ठाकरे हे गृहमंत्री असताना त्यांनी हा प्रकल्प पळवला होता. तेव्हा भाजपा जेष्ठ नेते एकनाथराव खडसे व संजय सावकारे यांनी राज्य राखीव पोलीस केंद्रासाठी प्रयत्न केले व त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती.
तेव्हा वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाली होती. २००४ ते २००९ पर्यंत संतोष चौधरी हेच आमदार होते. मात्र त्यांनी राज्य राखीव पोलीस केंद्रासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नसल्याचा आरोप प्रा.सुनिल नेवे यांनी केला आहे. सदर बैठकीस नगराध्यक्ष रमण भोळे, न.पा. गटनेता हाजी मुन्ना तेली, शहराध्यक्ष दिशेने नेमाडे, युवराज लोणारी, पिंन्टु कोठारी,राजेंद्र आवटे, किरण कोलते, ॲड. बोधराज चौधरी, वसंत पाटील, पवन बुंदले, देवा वाणी, अजय नागराणी, परिक्षित बऱ्हाटे, हाजी शफि पहेलवानआदी उपस्थित होते.