तुझ्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तुझ्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत २७ वर्षीय तरुणाने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना जळगाव येथील शनिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका भागात घडली.
जळगाव शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी दीपक कोळी वय २७ वर्ष. हा वेल्डींगचे काम करण्यासाठी आला होता. त्याने या मुलीसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर तिच्या वडिलांना मारून टाकेन अशी धमकी देत मुलीवर अत्याचार केला. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली.
मुलीला चालताना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी तिच्या वडिलांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून दीपक कोळी वय २७ वर्ष याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.


