क्राईममहाराष्ट्र

धक्कादायक : “पीएम किसान” ची फाईल डाऊनलोड करताच २ कोटी ४८ लाख खात्यातून गायब

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ‘पी एम किसान डॉट एपीके’ ही फाईल डाऊनलोड करताच २ कोटी ४८ लाख १५६ रुपये खात्यातून चोरांनी परस्पर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अमरावती मधील दत्त मंदिर, कुंभारवाडा परिसरात राहणारे अविनाश रोतळे.वय ३६ वर्ष. हे एका व्हॉट्स ॲप गृपवर असून त्यांना ग्रूपवर ‘पी एम किसान डॉट एपीके’ ही फाईल प्राप्त झाली होती. त्यात पी एम किसान योजना संबधीत काही माहिती असेल या समजातून त्यांनी ती फाईल वर क्लिक करून अविनाश रोतळे यांनी ती फाईल डाऊनलोड करून घेतली. त्या नंतर त्यांनी हे ॲप रीतसर इंस्टॉल देखील केले. आणि त्या नंतर काही वेळातच भामट्यांनी त्या मोबाईल वर ताबा घेत त्यांच्या खात्यातून २ कोटी ४८ लाख १५६ रुपये दुसऱ्या खात्यात वळते केले.

दरम्यान, पी एम किसान च्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी शासनाचे पोर्टल आहे. पी एम किसान डॉट एपीके अशा प्रकारच्या कोणत्याही अप ची लिंक ओपन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!