भुसावळ

हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले, पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मध्यप्रदेशासह हतनूर धरण श्रेत्रात संततधार पाऊस झाल्याने हतनूर धरणाचा पाणलोट क्षेत्रात पाण्याचा मुबलक साठा जमा झाला असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असून रविवार दि. २५ रोजी १८ दरवाजे उघडण्यात आले होते.पुन्हा पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आज दि.२६ रोजी २० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.

धरणाच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याचे सोमवार दि. २६ रोजी ६८.८ एम एम पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर हतनूर धरण पाणलोट परिसरात ९ एम एम पावसाची नोंद करण्यात आलेली असून धरणाचे २० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. त्या मुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग २७४८ सुरू असून धरणाचा एकूण पाणी साठा ५७.११ टक्के इतका भरला आहे.

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!