हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा स्त्रोत मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यात हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामधून ९९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील परिसरात मुबलक पाणी पुरवठा करणारे महत्त्वाचे धरण म्हणून हतनूर धरणाची ओळख आहे .
हतनूर धरणाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. मध्यप्रदेशातून सुद्धा पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असते. पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने हतनूर धरणाचे २० दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.