जळगाव जिल्ह्यात २१ हवालदार झाले सहायक पोलीस उपनिरीक्षक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांचे पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले. सर्वाना तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्तीचे अधीन राहुन सधाच्या नेमणुकीच्या ठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक / सहाय्यक फौजदार व पोलीस हवालदार या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. सदर आदेशात एकुण २१ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय), व एकुण १९ नाईक पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदार (हेकॉ) पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
यांची झाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
नंदकिशोर सोनवणे (भुसावळ उपविभाग), विलास बाबुराव पाटील (भडगाव पोलीस स्टेशन), चंद्रशेखर गजानन गाडगीळ (भुसावळ शहर), मनोज काशिनाथ जोशी (जिविशाखा), रीयाजुद्दीन काझी (भुसावळ तालुका), राजेंद्र आधार पाटील (पोलीस मुख्यालय), वसंतराव बेलदार (सायबर पोलीस स्टेशन), के गणेश कुमार (पोलीस मुख्यालय), महिंद्र मराठे (पारोळा स्टेशन), शेख युनूस मुसा (भुसावळ तालुका) प्रवीण युवराज पाटील (वरणगाव पोलीस स्टेशन), अशोक सदाशिव पाटील (जळगाव तालुका), दिनेश उत्तमराव पाटील (आर्थिक गुन्हे शाखा), राजेंद्र साहेबराव पाटील, विनोद राघो पाटील (दोन्ही मोटर परिवहन विभाग), संदीप देवराम पाटील (पोलीस मुख्यालय), सुनील बाबुराव पाटील (जळगाव तालुका), राजेंद्र परदेशी (पहूर पोलीस स्टेशन), विजय काळे (जळगाव उपविभाग), अकबर तडवी (वायरलेस मोबाईल), राजेंद्र भागवत पाटील (चाळीसगाव ग्रामीण)
यांची झाली पोलीस हवालदारपदी पदोन्नती –
चंद्रकांत बोदडे, गजमल पाटील (दोन्ही मुक्ताईनगर स्टेशन), विनोद वाघ (भुसावळ तालुका), दीपक माळी (धरणगाव स्टेशन), विकास खैरे (पाचोरा स्टेशन), जितेंद्र माळी (एचएसपी चाळीसगाव), एकनाथ धनराज पाटील (भडगाव स्टेशन), चेतन सोनवणे (एमआयडीसी स्टेशन), दीपक नरवाडे (मेहुनबारे स्टेशन), विजय शामराव पाटील (एलसीबी), प्रभाकर पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, चाळीसगाव), गोवर्धन बोरसे (चाळीसगाव ग्रामीण), ललित भदाणे (जळगाव शहर) विजय साळुंखे (एचएसपी, पाळधी), राकेश पाटील (चाळीसगाव), नरेंद्र नरवाडे (पाचोरा), हेमंत कोळी (चोपडा शहर), योगेश पाटील (जळगाव शहर) रवींद्र अभिमान पाटील (अमळनेर).