भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ मध्ये २५ गॅस सिलिंडर जप्त, गॅस रिफिलिंगचे अवैध अड्डे उध्वस्त

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध् व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. या संदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली मिळाल्याने शुक्रवारी दि.,१७ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी भुसावळ शहरातील दोन अवैध रिफिलिंगच्या अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून कारवाई करण्यात आली.

बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन्ही ठिकाणच्या छाप्यात २५ गॅस सिलेंडर/टाक्या, दोन रिफिलिंग मशीन, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच एक रिक्षा वाहन जप्त करण्यात येवून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्या मुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहर बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पांडुरंग टॉकीज जवळील राहुल नगर भागात गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसाना मिळाली. त्या नुसार पोलिस विभाग व महसूल पुरवठा विभाग या दोघांच्या पथकाने घटनास्थळी पोहचून एक इसम रिक्षा क्रमांक.एम.एच. १९ ए.ई.९९४४ मध्ये मशीन व्दारे गॅस रिफिलिंग करतांना मिळून आला. सदरील इसमास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एच.पी.कंपनीचे २० गॅस सिलेंडर टाकी, एक रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक रिक्षा वाहन असे ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केला.

ही कारवाई पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि अमित बागुल, सोपान पाटील, भूषण चौधरी, तहसील विभागाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे व पुरवठा अधिकारी रोशन रेवतकर यांच्या पथकाने केली.

तर दुसरी कारवाई शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यावल रोड वरील बल्लू गॅरेज समोर सार्वजनिक जागी पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५ गॅस सिलेंडर टाक्या, एक रिफिलिंग मशीन असे साहित्य जप्त करून शहर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले. या बाबत बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!