रावेर मध्ये ३०० किलो गोमांस जप्त, ९ जणांना अटक
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर शहरात २९६ किलो वजनाचे ५३८०० रुपयांचे गोमांस जप्त करण्यात आले असून ९ जणांना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई रावेर पोलिसांनी केली.
रावेर शहरातील कुरेशी मोहल्ला भागात अवैधरीत्या गोमांस बाळगून उघड्यावर गोमांसची विक्री होत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी पोलिसांच्या पथकाने छापा मारून कारवाई केली. यात ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २९६ किलो वजनाचे ५३८०० रुपयांचे गोमांस जप्त करण्यात आले.
कलीम खान हिरे खान, शेख चांद शेख रहेमान, शेख लाल शेख कडू, शेख समीर शेख नसीर, शेख आल्तमश शेख अख्तर, शेख आल्ताफ शेख गफ्फार कुरेशी, शेख लुकमान शेख बिस्मिल्ला कुरेशी, शेख फरीद शेख रहेमान, सोहेल रफिक शेख, सर्व राहाणार. कुरेशी मोहल्ला, रावेर. या ९ जणांना उघड्यावर गोमास कब्जात बाळगून विक्री करीत असताना पकडण्यात आले.
या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना रविवार पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली असून ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस शिपाई महेश मोगरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे व संभाजी बिजागरे यांचे पथकाने केली.