केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्ती साठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील 31 विद्यार्थ्यांची निवड
कुंभारखेडा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज. योगेश कोष्टी l केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील 31 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाद्वारे संस्कृत भाषेच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यानुसार संपूर्ण देशभरातील संस्कृत विषयात दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विद्यापीठामार्फत प्रति विद्यार्थ्यांस वार्षिक 6000रुपयांची संस्कृत मेधावी शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर शिष्यवृत्तीसाठी सालाबादप्रमाणे यंदाही गौरवशाली परंपरा कायम राहत महाविद्यालयातील 31 विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे विद्यापीठाद्वारे नुकतेच अधिकृत पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती:–
1)अवचार नंदीनी वसंत 2) अम्बोडकर वैष्णवी संजय 3) इंगळे देवेंद्र अतुल 4) जोशी देवदत्त सुनिल 5) वाघुळदे हेरंब विजय 6) अहिरे मोहित संजय 7) पाटील नकुल संजय 8) पाचपांडे काद्यंबरी नरेंद्र 9) पाटील तन्मयी रमेश 10) कावडे भक्ती रविंद्र 11) भक्कड सुरभी रुपेश 12) सोनवणे जिज्ञासा निंबा 13) येवले अथर्व सतिष 14) ब्रह्मक्षत्रिय अथर्व प्रकाश 15) काबरा दिशा मुकेश 16) फक्कड कुलश्री जितेंद्र 17) ब्राम्हणकर रोहित बापूराव 18) मोरे यामिनी प्रकाश 19) बारी गायत्री योगेश 20) भामरे आयुष महेंद्र 21) पाटील मृन्मयी रावसाहेब 22) कुलकर्णी जास्वंदी संजय 23) सुरवणकर ओजस सुशिल 24) महाजन दामिनी गणेश 25) आठवले श्रावणी जितेंद् 26) पाटील भावेश विजय 27) नेरपगार प्रतिक योगेश
28)रुपेश सतिश ढाके
29)निर्वेद संदिप पाटील
30)भाग्यश्री संग्रामसिंग राजपूत
31)सिद्धी रमेश जैस्वाल
वरील यशवंत,गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, उपप्राचार्य प्रा. श्रीमती के.जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. श्री.आर.बी. ठाकरे, समन्वयक प्रा.सौ. स्वाती बऱ्हाटे, प्रा.श्री. उमेश पाटील, विषय शिक्षक प्रा. श्री.अर्जुनशास्त्री मेटे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केलेले आहे. तसेच सर्व कार्यालयीन कार्यासाठी वरीष्ठ लिपिक श्री.मंगेश नेवे व श्री.युवराज पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.