३५ वर्षीय तरुणाचे दोन अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील चाळे
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव शहरातील ६ वर्षीय आणि ९ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलीं सोबत अश्लिल चाळे करत एका ३५ वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता घडली आहे. या संदर्भात रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात मनोज भीमराव धनगर वय- २५ रा. जळगाव. याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, जळगाव शहरात परिवारासह वास्तव्यास असलेल्या ६ वर्षीय आणि ९ वर्षीय अशा दोन अल्पवयीन बालिकांसोबत मनोज भीमराव धनगर वय- २५ रा. जळगाव याने अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार रविवारी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित मुलींच्या नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता आरोपी मनोज भीमराव धनगर वय २५ वर्ष. रा. जळगाव. या तरुणा विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.