क्राईमचोपडाजळगाव

अनैतिक संबंधातून डोक्यात दगड घालून ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून डोक्यात दगड घालून एका ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली असल्याची घटना चोपडा शहरात घडली. चोपडा शहरातील पं.स. सभापती निवास असणाऱ्या स्थळी एका अज्ञाताचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी काही तासांतच आरोपीस अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात एका अज्ञाताचा मृतदेह पडल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी तपासकामी चार पथके तयार करून धरणगाव, पारोळा आदी ठिकाणी पाठवली. मात्र, चार तासांत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी राजेश काशीराम बारेला (३३, चाचऱ्या, ता. सेंधवा) या आरोपीस गोरगावले रोडवरून ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचं सांगितलं जात आहे .

चोपडा शहरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणारे दोन पुरुष व एक स्त्री हे सोबत कचरा गोळा करतात. यापैकी मृत व्यक्ती आणि सोबत असणारी जानू राजू बारेला (३५) यांचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवत राजेश काशीनाथ बारेला याने २५ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मृताच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केली.तसेच जानू बारेला हिला देखील राजेश बारेला याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!