भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ येथे ३५८ किलो भेसळ खाद्यतेलांचा साठा जप्त

.
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरातील श्रीकेश राजेश दुबे यांच्या मालकीच्या श्री लक्ष्मीनारायण ट्रेडिंग या दुकानात छापा मारून ३५८ किलो सुटे खाद्यतेल जळगाव अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केले. या तेलाची किंमत ३५ हजार ८५९ रुपये असून ते जप्त करीत व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावल्याने शहरातील व्यापारीवर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भुसावळातील बाजारपेठ भागात श्री लक्ष्मीनारायण ट्रेडिंग या दुकानात जळगावच्या अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस.एम.पवार व ए. के. साळुंके यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पथकाने भेसळ असल्याच्या संशयावरून पामतेल व रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या कारवाईने मात्र व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!