भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

दोन ट्रकांमध्ये म्हशी कोंबून निर्दयीपणे वाहतूक, ३८ म्हशींची सुटका

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळील रस्त्यावर दोन ट्रक रविवारी १६ जून रोजी पहाटे ५ वाजता अवैध वाहतूक करत असलेल्या दाटीवाटीने ३८ म्हशी निर्दयीपणे कोंबून ट्रकमध्ये वाहून नेत होते. म्हशींची सुटका करण्यात आली असून दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले आहेत.

भुसावळ तालुक्यातील बोहार्डी ते हतनूर गावादरम्यानच्या रस्त्यावरून विना परवाना दोन ट्रकमधून म्हशींची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकाना यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पाठलाग करत पोलिसांना सांगुन या म्हशींची सुटका केली.

रविवारी १६ जून रोजी पहाटे ५ वाजता कारवाई करत ट्रक क्रमांक (एमएच १८ बीझेड ६४७७) आणि (एमपी ०९ डीजी ६६४४) हे दोन ट्रक अडविले. चौकशी केली असता यात दोन्ही ट्रकमध्ये एकुण ३८ म्हशी आढळून आल्या. या म्हशींना दाटीवाटीने कोंबून बांधण्यात आले होते. ही वाहतूक विनापरवाना होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहे. तर म्हशींची सुटका करण्यात आली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक लखन सखाराम शिंदे (वय ३५ रा. सोंधवा जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश) आणि राजूखॉ सलीम खॉ (वय ४० रा. खरगोन राज्य मध्यप्रदेश) या दोघांवर सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे हे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!