आ. एकनाथराव खडसेंच्या प्रयत्नांनी चारठाणा, माळेगावं वनउद्यानाच्या विकासासाठी 4.65 कोटींचा निधी मंजुर !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या कुशीत नयनरम्य वातावरणात वसलेल्या चारठाणा येथिल श्री सिद्ध भवानी माता मंदिर,लक्ष्मी नारायण मंदिर आणि मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावर वन हद्दीत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या जागृत कालिंका माता मंदिर येथे पर्यटन वाढीस चालना मिळावी भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या व पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने आतापर्यंत वन उद्यान निर्मिती आणि भाविकांच्या, पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने अनेक विकासकामे झाली होती
पर्यटन वाढीसाठी या ठिकाणी अजून विकासकामे व्हावीत यासाठी आ एकनाथराव खडसे प्रयत्नशील होते त्या अनुषंगाने त्यांनी राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे चारठाणा, माळेगाव येथे विविध विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी असे एकूण 10 कोटी रुपये निधीची मागणी केली होती.त्या पैकी 4 कोटी 65 लक्ष रुपये निधीला मंजुरी मिळाली असून वन विभाग मार्फत दि 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णय क्र संकीर्ण 2024/प्र क्र 63/ भाग-1/फ 9 सन 2024-25 करिता निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास (2406-2295) या राज्य योजने अंतर्गत चारठाणा येथे विविध विकास कामे करण्यासाठी 155.20 लक्ष रुपये आणि माळेगाव वन उद्यान येथे विविध विकास कामे करण्यासाठी 310.40 लक्ष रुपये निधीला मंजुरी मिळाली आहे
या निधी अंतर्गत वन उद्यानात विवीध झाडे फुलझाडे लॉन लावणे,रोज गार्डन निर्मिती, लहान मुलांसाठी विविध खेळाचे साहित्य बसवणे,आकर्षक प्रवेशद्वार निर्मिती, पाथ वे निर्मिती, कुंपण निर्मिती पेव्हर ब्लॉक बसवणे,तलावात जलपर्यटनासाठी बोट ,तिकीट खिडकी, जिवरक्षक जॅकेट पुरवठा करणे, सिमेंट बाक, सोलर लाईट बसवणे, स्वच्छता गृह निर्मिती, मचाण निर्मिती, पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईन इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत अशी माहिती आ एकनाथराव खडसे यांचे स्विय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली