भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्ह्यातील ४ भावी डॉक्टर विद्यार्थ्यांचा रशियातील नदीत बुडून मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेल्या ४ विद्यार्थ्यांचा रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेला जळगांवचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा मिळाला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत त्यांचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला आहे. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आहेत. तर तिसरा विद्यार्थी भडगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर चौथा विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील यावल येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

चारही मृत विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ४ जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून तिघे जण बुडाल्याची माहिती आहे.

जिया फिरोज पिंजारी, वय २०. जीशान अशपाक पिंजारी,वय २०. दोन्ही रा.अमळनेर.  गुलामगज मोहम्मद याकूब मलिक वय २१.रा.यावल, आणि हर्षल अनंतराव देसले वय १९. रा.भडगांव. तर निशा भूपेश सोनवणे वय १९ हिला वाचवण्यात यश आलं आहे. अशी जळगाव जिल्ह्यातील मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या पैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर तिघे विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे. ४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. इतर तिघा विद्यार्थ्यांचा मृतदेहाचा शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!