जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी दरम्यान ४१ लाखांची रोकड जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदीत शुक्रवारी दि. १५ रोजी तब्बल ४१ लाख ४५ हजार रुपयांची रोकड जप्त केली.
रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६ लाख ७० हजार, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत ६ लाख, एमआयडीसी पोलीस स्टेशनने २ लाख ७५ हजार, जामनेर पोलीस स्टेशनला १७ लाख रुपये, फत्तेपूर येथे ३ लाख, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला १ लाख तसेच भुसावळ तालुका, बाजारपेठ, वरणगाव पोलीस स्टेशन मिळून ५ लाख रुपये असे एकूण ४१ लाख ४५ हजार रुपये पोलिसांनी नाकाबंदीत जप्त केले आहे. त्याबाबत चौकशी सुरु आहे.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गैरकृत्य करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत कारवाई कायम सुरु राहील, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली..