देवांग कोष्टी समाजाच्या वतीने 42 व्या वधू वर परिचय व पुरस्कार मेळावा आणि आरोग्य व रक्तदान शिबिर
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देवांग कोष्टी समाजाच्या वतीने स्वारगेट पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 42 व्या भव्य वधू वर परिचय मेळावा, पुरस्कार सोहळा, आणि मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या वधू वर परिचय मेळाव्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाणहून सुमारे 1250 वधू-वरांची नोंदणी करण्यात आली, सुमारे 60 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
100 जणांनी रक्तदान केले, नेत्र तपासणी करून 60 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, यावेळी 50 ज्येष्ठ नागरिकांची मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश नाना सातपुते व इचलकरंजी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार उत्तमराव चोथे, संजय कांबळे, नारायण उंटवाले (सर) यांना तसेच देवांग पुरस्कार किशोर खोजे, विजय टिकोळे, शिवाजीराव वाघुंबरे यांना, आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्कार अविनाश सांगोलकर, वंदना नंदकुमार गोडसे यांना व आदर्श माता पुरस्कार श्रीमती पुष्पावती मारुतीराव सपाटे यांना देण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे आमदार हेमंत रासने, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, आय ए एस अधिकारी ओंकार गुंडगे, अशोक मुसळे, भूषण मुसळे, अमित कोष्टी, देवांग कोष्टी समाज पुणेचे अध्यक्ष मल्हारराव ढोले, विश्वस्त दत्तात्रय ढगे, रोहिदास वारे, विजय नडे, बालाजी बोत्रे, शिवाजी वाघूमबरे, अरुण वरोडे, रमाकांत असलकर, गणेश टेके, सतीश लिपारे, एडवोकेट हरिश्चंद्र डोईफोडे, सचिन देवांग, संजय गोडसे, रवींद्र भुते, शोभा ढगे, मेघमाला पांडकर, अश्विन चोथे, वैशाली भंडारे, अर्चिता मडके, सूर्यकांत ढगे, ज्ञानेश्वर बोडके आदि यावेळी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता मडके यांनी केले व आभार बालाजी बोत्रे यांनी मानले,