जळगाव

ठेका देण्याच्या नावाने ४५ लाखांची फसवणूक, निवृत्त अभियंत्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखलीचे न्यायालयाचे आदेश !

जळगांव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचे अंतर्गत विविध कंपन्यांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून शेततळे कामांचा ठेका मिळवून देण्याच्या नावाने ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव न्यायालयाने निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अजय बढे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पत्रकार परिषदेत अजय बढे म्हणाले की, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांचे अंतर्गत शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे सांगून निवृत्त वरिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, तीन सनदी लेखापाल, कंपनीचे संचालक व अन्य दोघे जण यांनी संगनमत करून माझ्याकडून ४५ लाख रुपये घेतले होते. विशेष म्हणजे अत्यंत चलाखीने व नियोजनबद्ध पद्धतीने सर्वांनी फंड मिळवण्यासाठी चंदिगढ, मुंबई येथे नेवून ४५ लाख रुपये उकळले. मात्र, आरोपींनी पैसे उकळून देखील शेततळे कामांचा ठेका मिळवून दिला नाही व घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मी वेळोवेळी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार अर्ज केले होते. मात्र, आरोपी हे प्रतिष्ठ प्राप्त असल्याने या अर्जावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दिसून आल्याने तत्कालीन पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांची समक्ष भेट घेवून तक्रार केली होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

याप्रकरणात तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव येथील निवृत्त वरिष्ठ अभियंता व्हि.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, सुहास भट (सनदी लेखापाल), सूर्या चौहान (संचालक-गोल्ड रिव्हर कंपनी, मुंबई), पंकज नेमाडे, ललित चौधरी, पवन कोलते (सनदी लेखापाल), व्हि.के.जैन (सनदी लेखापाल) हे आरोपी आहेत. मात्र, या प्रकरणातील आरोपी हे प्रतिष्ठित असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने फक्त दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे पत्र दिल्याने मुख्य आरोपींचा बचाव केला जात असल्याचे लक्षात आले होते.

मी जळगाव न्यायालयांत धाव घेवून संगनमत करून ४५ लाखात फसवणूक करणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सर्व कागदपत्रे व परिस्थिती लक्षात घेवून जळगाव न्यायालयाने वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती जानव्ही केळकर यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!