ब्रेकिंग : ५ वर्षीय चिमुकलीवर २५ वर्षीय नराधमाचा अत्याचार, जळगाव जिल्हा हादरला
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | खाऊ देण्याच्या बहाण्याने ५ वर्षाच्या चिमुकलीला घरात बोलावून चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय नराधम तरुणाने अत्याचार केल्याची घटना दि. १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील गोरगावले रस्त्यावरील एका शेतातील झोपडीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील गोरगावले रोडवर असलेल्या झोपड्यांमध्ये मध्यप्रदेशातील परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्या शेजारीच राहत असलेल्या २५ वर्षीय मयाल (पूर्ण नाव माहीत नाही) मूळ रा. पिंपऱ्यापाणी ता. वरला, जि. बडवानी. याने शेजारी राहत असलेल्या पाच वर्षीच चिमुकलीचे आई वडील घरी नसताना तीला खाऊ देण्याचे अमिष दाखवून घरात बोलाविले. त्यानंतर चिमुकलीवर त्याने अत्याचार केला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या नराधमापासून चिमुकलीची सुटका केली.या वेळी घटनास्थळी मोठा जमाव गोळा झाला. संतप्त जमावाने अत्याचार करणाऱ्या नराधमाची चांगलीच धुलाई केली.
उदरनिर्वाह निमित्त आलेले चिमुकलीच कुटुंब हे एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. या प्रकाराबाबत त्यांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली, त्यांनी पीडित मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत त्या नराधमाला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडविले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय जितेंद्र वल्टे, एकनाथ भिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित नराधमाला अटक करण्यात आली आहे.