५० वर्षीय नरधमा कडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
वरणगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वरणगाव शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अंधाराचा फायदा घेत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना १० नोव्हेंबर रविवार रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील मकरंद नगरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह रहात असून १० नोव्हेंबर रविवार रोजी रात्री ९.३० वाजता कामावरून घरी जात होती. त्यावेळी संशयित आरोपी राजेंद्र जोहरीलाल जैन वय ५० रा.वरणगाव याने पिडीत मुलीला घरी सोडून देण्याचा बहाणा करत तिला दुचाकीवर बसून नेत अंधाराचा फायदा घेत तिच्या सोबत अश्लिल चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडीत मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आरोपी राजेंद्र जोहरीलाल जैन वय ५० रा.वरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहे.