गावात गुटखा विक्री केल्यास ५ हजार रुपये दंड, चिनावल च्या ग्रामसभेत ठराव
चिनावल, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील चिनावल येथे ग्रामपंचायतीची जनरल ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. ग्रामसभेत गावातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थितीत होते.
ग्रामसभेच्या सुरुवातीस नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील मृत्यमुखी पडलेल्या भाविकांना तसेच गावातील मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीनअर्पण करण्यात आली. त्या नंतर मागील सभेचे अहवाल वाचन ग्रामसेवक के आर भगत यांनी केले. ग्रामसभेत विविध प्रकारचे महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
त्यात लिंगायत समाजातील लोकांना स्मशानभूमी साठी जागा देण्यात यावी, सैनिकांना व माजी सैनिकांना त्यांच्या कोणत्याही एका मालमत्ता करावर सुट देण्यात यावी, गावातील अवैध दारू विक्री यापूर्वीच्या ग्रामसभेत बंद करण्यात आली आहे व आताच्या ग्रामसभेत शासन मान्य दारूचे दुकान गावा बाहेर घेऊन जावे, व गावातील गुटखा विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी विक्री करताना कोणी आढळल्यास ५०००/- रुपये दंड वसूल करण्यात यावा. असा सर्वानुमते ठराव करण्यात आला.
तसेच ज्या लोकांना धान्य मिळत नाही अशा लोकांना धान्य मिळविण्यासाठी वरीष्ठ कार्यालय व अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मुंबई याच्याकडे पाठपुरावा करावा असे ठरले व सन २०२५ -२०२६ चा विकास आराखडा तयार करण्यात आला.
यावेळी तंटा मुक्ती अध्यक्षपदी जितेंद्र सोनजी नेमाडे यांची निवड करण्यात आली. तसेच गावातील सर्प मित्र कल्पेश साळुंके यांचा सत्कार सरपंच यांच्या हस्ते वडाचे रोप देऊन करण्यात आला व त्यांना एक सुरक्षित किट त्यांना ग्रामपंचायती तर्फे देण्यात यावे असे ठरले. ज्या ग्रामपंचायत कर्मचार्यांनी उत्कृष्ट कामे केली त्यांचा सुद्धा ग्रामस्थांच्या हस्ते वडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
व शेवटी राष्ट्रगीत म्हणून ग्रामसभा संपविण्यात आली. यावेळी गावातील अनेक स्त्री पुरुष तसेच चंद्रकांत भंगाळे, संजय भालेराव, सदस्य शेषराज भालेराव, हेमांगी भंगाळे, ममता बोरोले ग्रामपंचायत कर्मचारी सचिन लोखंडे, राहुल नेमाडे यांचेसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.