सावदा येथे ६ गाईंची सुटका, चौघांवर गुन्हा दाखल
सावदा,ता. रावेर . मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा येथील ख्वाजानगर भागातील एका गोडाऊन मध्ये डांबून ठेवलेल्या सहा गाईंची( किंमत रुपये १,३५,०००) सुटका केल्याची घटना दिनांक ३ डिसेंबर मंगळवार रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथील खाजा नगर भागातील शेख रसूल शेख चाँद कुरेशी यांचे पत्री गोडाऊन मध्ये १५०००रुपये किमतीची गवरान गाय, वय ७ वर्ष. , १५००० रुपये किमतीची सैवाल क्रॉस जातीची गाय , वय ४ वर्ष., ३५००० रुपये किमतीची गीर जातीची गाय, वय ७ वर्ष , ३०,००० रुपये किमतीची कंकरेज जातीची गाय, २५,००० रुपये किमतीची गीर क्रॉस जातीची गाय, वय ९ वर्ष., व १५,००० रुपये किमतीची नेमाडी जातीची गाय ,वय १२ वर्ष., अशा १,३५,००० रुपये किमतीच्या ६ गाई दोरीने गळा व पाय बांधलेल्या स्थितीत हालचाल करणे शक्य होणार नाही अशा स्थितीत निर्दयतेने त्यांना डांबून ठेवले असताना त्यांची सोडवणूक करून त्यांना रावेर येथील गो शाळेत रवाना करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात गोडाऊन मालक १) शेख रसूल शेख चाँद कुरेशी, वय ४० वर्ष. ,२) शेख जग्गा शेख कुरेशी, ३) शहाबाज जमील कुरेशी, ४) साहिल जमील कुरेशी,सर्व राहणार ख्वाजा नगर, सावदा. तालुका रावेर यांचेवर सावदा पोलिस स्टेशनला २५०/२०२४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम महा. पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११९ प्रमाणे पो. का . मयूर पाटील यांचे फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावदा पोलिस स्टेशन चे सपोनी विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उमेश पाटील हे करीत आहेत.