विवस्त्र व्हिडिओ कॉल द्वारे ब्लॅकमेल करीत विद्यार्थ्यांकडून ६ लाख उकळले
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १९ वर्षीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ कॉलद्वारे विवस्त्र व्हिडिओ करून ब्लॅकमेल करीत त्याच्याकडून ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ५ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगावातील १९ वर्षीय तरुण नाशिक येथे बीसीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ५ सप्टेंबर रोजी तो फेसबुक पाहत असताना त्याने ‘ऑनलाईन मुलींशी बोलण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करा’ अशा मेसेजला क्लिक केले. त्यानंतर एक अँप ओपन झाले व त्यात मुलींच्या नावाचे वेगवेगळे खाते दिसले. विद्यार्थ्याला त्या नंतर धमकावण्यात आले.
या पासून वाचायचे असल्यास त्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार घाबरून सदर विद्यार्थ्याने समोरील व्यक्तीने पाठविलेल्या पेमेंट लिंक वर वेळोवेळी आता पर्यंत एकूण ५ लाख ९५ हजार ४५० रुपये पाठविले. ही रक्कम विद्यार्थ्याने चाळीसगावस्थित वडिलांच्या बँक खात्यातून ट्रान्सपर केल्याने काही दिवसांनी हा प्रकार त्याने घरी सांगितला. यानंतर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली तपासात फसवणूक जेआरमारी महिला तोतया पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले. या फसवणूक करणाऱ्या महिला तोतया पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सतीश गोराडे हे पूढील करीत आहेत.


