भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधरणगाव

दुकाने व गाड्यांच्या जाळपोळीत ६३ लाखांचे नुकसान, ७ अटकेत, २५ जणांवर गुन्हे दाखल, पाळधीत संचारबंदी

धरणगाव/जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या हॉर्न वाजवत चारचाकी वाहनाचा धक्का लागल्यानंतर उसळलेल्या दोन गटातील दंगलीत जमावाने रस्त्यावरील दुकाने आणि वाहनांची जाळपोळ केली. दोन गटात संघर्ष उफाळून आला. हा प्रकार वर्षाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडला. या घटनेत ११ दुकानांसह ४ चारचाकी वाहने जळाल्याने अंदाजे ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात २० ते २५ जणांविरुद्ध पाळधी दुरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दंगल प्रकरणी ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

३१ डिसेंबर मंगळवार रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात वाहनाचा कट लागल्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून गावातील २० ते २५ जणांच्या अज्ञात जमावाने दगडफेक करून रस्त्यावरील बंद असलेल्या दुकानांना आणि रस्त्यावरील चार वाहनांना पेटवून दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जाळपोळ आणि दगडफेकीत अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी जावेद पथरू पिंजारी (वय ४०, रा.बागवान मोहल्ला, पाळधी ता.धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाळधी पोलीस ठाण्यात अनोळखी २० ते २५ जणांविरोधात दंगलीसह तोडफोड आणि आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जाळपोळीत यासीर अमित देशमुख यांचे मोबाईल दुकानात दीड लाखांचे मोबाईल चोरून नेले. जावेद पथरू पिंजारी यांचे चप्पल दुकानाला आग लागल्याने ८ लाखांचे नुकसान झाले. शेख हबीब शेख शरीफ यांचे पानसेंटरला आग लावून २ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान केले. वकार अहमद शेख शकील यांच्या घरासमोरील २ दुचाकी आणि घरांवर दगडफेक करून ५ हजार रुपयांचे नुकसान केले. फारुक शेख शरीफ यांचे बाजार पट्ट्यातील इलेक्ट्रिक दुकानाला आग लावून अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच एजाज युसूफ देशमुख यांच्या मक्का शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ऑटो पार्ट्स दुकान फोडून ३ लाख रुपयांचे सामान चोरून नेला. दानिश शेख सत्तार यांच्या रेफ्रिजरेटर दुकानाचे १० लाखांचे नुकसान झाले. शेख साबीर शेख सादिक यांच्या मोबाईल शॉप दुकानाचे शटर तोडून नवीन मोबाईल व एलसीडी यांची तोडफोड करून २ लाखांचे नुकसान झाले. अक्रम खान अन्वर खान यांचे दुकान फोडून ४० हजार रुपये किमतीचे अंड्यांचे नुकसान केले. रफिक खान अन्वर खान यांच्या आमलेट सेंटर हातगाडीचे नुकसान करत ३ हजार रुपयांचे नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्याजवळ शेख तसव्वर शेख हमीद यांचे मालकीचे सॅन्ट्रो, टाटा, झेनॉन पोलो आणि मालवाहतूक पिकअप वाहन अशी ४ वाहने भेटून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान केले. सर्व मिळून अंदाजे ६३ लाख १८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!