तिसऱ्या आघाडीचे ८ उमेदवार जाहीर, रावेर मधून अनिल चौधरी यांना उमेदवारी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुकां घोषित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. रविवारी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुतीमधील इतरही घटक पक्ष लवकरच यादी जाहीर करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली असून ६६ उमेदवारांची घोषणा केली आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडी कडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडीने आपल्या ८ उमेदवारांची नावे जाहीर केली असून स्वाभिमानीच्या २ उमेदवारांची नावे उद्या २२ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, परिवर्तन महाशक्तीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर रावेर मधून भुसावळ चे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना रावेर – यावल विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर वंचित कडून रावेर यावल विधानसभा मतदार संघात शमिबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार
१. अचलपूर – बच्चू कडू – प्रहार
२. रावेर – अनिल चौधरी – प्रहार
३. चांदवड – गणेश निंबाळकर – प्रहार
४. देगलूर – सुभाष सामने – प्रहार
५. ऐरोली – अंकुश कदम- महाराष्ट्र स्वराज पक्ष
६. हदगाव हिमायतनगर – माधव देवसरकर – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
७. हिंगोली – गोविंदराव भवर – महाराष्ट्र राज्य समिती
८. राजुरा – वामनराव चटप – स्वतंत्र भारत पक्ष
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा