फुगा फुगवताना तोंडातच फुगा फुटला, ८ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फुगा फुगवताना तोंडातच फुगा फुटल्याने फुग्याचा तुकडा घशात गेल्याने फुग्याचे तुकडे श्वासनलिकेत अडकल्याने इयत्ता दुसऱ्या इयत्तेत शिकत असलेल्या आठ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यात घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
धुळे शहरात साक्री रोडला लागून असलेल्या यशवंत नगर मध्ये राहणारी डिंपल मनोहर वानखेडकर. वय ८ वर्षे. ही मुलगी नेहमी प्रमाणे इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत असताना तिला घराजवळ पडलेला फुगा दिसला. डिम्पलने फुगा घेतला आणि तो फुगवला. मात्र, फुगा फुगवताना फुटला. आणि या फुग्याचा तुकडा डिंपलच्या घश्यात गेला. जास्त दाबामूळे फुगा फुटला. याचा एक तुकडा डिंपलच्या घशातून खाली उतरून श्वास नलिकेत अडकला. घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्याने तिचा श्वास कोंडला. श्वास घेण्यास तिला त्रास जाणवू लागला. हा प्रकार तेथील नागरीकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड सुरू करत मुलांनी पळत जाऊन तिची आई मनीषा यांना हा प्रकार सांगितला. अत्यावस्थस्थितीत डिंपलला यशवंत नगरपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी तिला हिरे रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

त्यामूळे पुन्हा सुमारे ५ कि. मी. चा प्रवास करत तिला हिरे रुग्णालयात नेण्यात आले. यात सुमारे एक तास गेला. तो पर्यत डिंपल चा मृत्यू झाला होता. हिरे रुग्णालयात दाखल करण्यातआल्या नंतर उपचार सुरू करण्यापूर्वी दुदैवाने या बालिकेचा मृत्यू झाला होता. धुळे शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डिंपल चे वडील मजुरी करत असून तिला दोन मोठया बहिणी देखील आहे.