वृद्ध महिलेच्या पिशवीतून ८५ हजार लांबविले, मुक्ताईनगरातील प्रकार
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | वृद्ध महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून ८५ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार सोमवार २४ मार्च रोजी मुक्ताईनगर येथे झाला असून या संदर्भात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील बेबाबाई प्रभाकर काळे.वय ६२ वर्ष ही वृद्ध महिला सोमवार रोजी दुपारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आली असता तिच्या जवळ असलेल्या पिशवीतील ८५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने पिशवीला ब्लेड मारून लांबविली. झालेला प्रकार लक्षात आल्यावर झालेल्या चोरी बाबत शोध घेतला असता कुठलीही माहिती मिळाली नसल्याने अखेर या बाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासत पुढील तपासला सुरुवात केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल महेंद्र सुरवाडे हे करीत आहेत.