भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

८५ वर्षाच्या मालेगावच्या आजीचा आंतरराष्ट्रीय कथा वाचक पं.प्रदिप मिश्रा सिहोरवाले यांच्या हस्ते सन्मान

निंभोरा बुद्रुक ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | सिहोर मध्यप्रदेश कुबेरेश्वर धाम येथे नुकत्याच झालेल्या रूद्राक्ष महोत्सवा निमित्त शिव महापुराण कथेत मालेगाव येथील श्री शिवाय नमःस्तुभ्यम् सेवाभावी ग्रुप, संस्थेतर्फे देविदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सेवेकरी गृप आलेला होता या टिम मध्ये सेवेसाठी मालेगाव येथील रहिवासी ८५ वर्षाच्या आजीबाई जिजाबाई तुकाराम इंगळे आलेल्या होत्या त्या भोजन कक्षामध्ये सेवा देत होत्या त्यांची सेवा पाहून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदिप मिश्रा यांनी त्यांची दखल घेत व्यासपीठावरून त्यांचे कौतुक करत त्यांना बेल पत्र देऊन सन्मानित केले.

मालेगाव येथिल देविदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाय नमःस्तुभ्यम् सेवाभावी ग्रुप, संस्था चालवतात या ग्रुप मध्ये तीनशेच्यावर सदस्य असून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी पंडित प्रदिप मिश्रांजींच्या होत असलेल्या शिव कथांन मध्ये ते सेवा देत असतात.

ग्रुप, संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाण चे सदस्य जुळलेली असून त्यात अध्यक्ष मालेगाव चे देविदास पाटील, उपाध्यक्ष राजू सोनवणे नाशिक, खजिनदार प्रशांत बागुल मालेगाव, सल्लागार कुणाल भावसार जळगाव, सेक्रेटरी ऋषिकेश भंडारी छ.संभाजी नगर, कार्याध्यक्ष बालाजी बळकस परळी, महिला सेक्रेटरी संजीवनी जाधव छ.संभाजी नगर, कार्यवाहक योगेश पवार मालेगाव व योगेश शेवाळे टाकली, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे वाशिम, महिला उपाध्यक्ष मंगल कराळे सोलापूर, सचिव प्रमोद दाभाळे शिर्डी पुणतांबा, उपसचिव निर्मला सातपुते आष्टी असे वेगवेगळ्या ठिकाणची महिला, तरूण, तरूणी, जेष्ठ, श्रेष्ठ, प्रौढ असे एकूण ३०० च्या वर सदस्य ड्रेस कोट व शिस्तबद्धतेत सेवाभावी कार्य करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!