हिंगोणा येथील ३ रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह !
हिंगोणा ता.यावल (प्रतिनिधी)।
हिंगोणा येथील 24 वर्षीय मुलगी दिनांक 12 जून रोजी पॉझिटिव आढळून आली होती त्यामुळे त्यांच्या घरातील तीन लोकांना फैजपूर येथील कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे व १४ दिवसासाठी होम कॉरन टाईम करण्यात आले आहे एकंदरीत त्यामुळे हिंगोणे करांना दिलासा देणारी बातमी ठरली आहे सदर पॉझिटिव मुलगी ही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असून भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात कामास आहे तिला सर्दी-खोकला-ताप त्रास सुरू झाल्याने तिने स्वतःहून स्वॅब देऊन कोरोनाची तपासणी करून घेतली होती तिच्यावर फैजपूर येथील कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरु आहे परंतु तिच्या घरातील तीन जणांचा रिपोर्ट निगेटिव आल्याने हिंगोणे करांना दिलासा मिळाला आहे