भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

योजनेतून आत्तापर्यंत ९ लाख बहिणी बाद, लाडक्या बहिणींना आज मिळणार हप्ता ?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फेब्रुवारी महीना संपत आला तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहे.

पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून निकषांत न बसणाऱ्या महिलांन वगळून फक्त गरजू बहि‍णींनाच योजनेचा लाभ देण्याचे आयोजन समोर येत आहे. आता पर्यंत या पडताळणीनंतर एकूण ९ लाख बहिणी बाद झाल्याची माहिती मिळत आहे. या मुळे सरकारची ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वित्त विभागाकडून ३४९० कोटी वर्ग करण्यात आले आहेत.

आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी या महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे. नव्या निकषानुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यत हे पैसे जमा होऊ शकतात. काही तांत्रिक कारणांमुळे आत्तापर्यंत हे पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता, आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.

नव्या निकषांनुसार, हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे. लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी होत्या. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येत होते. मात्र आता लवकरच मुख्यमंत्र्यांच्या  पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या  खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!