भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा शिवारात गांज्याची ९३ झाडे जप्त, सावदा पोलिसांची कारवाई

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा शेतशिवारात गांजाची ९३ झाडांची केलेली लागवड सावदा पोलिसांनी जप्त केली. ह्या कारवाई ने परिसरात खळबळ उडाली आहे.

सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बैऱ्हम बुवा देवस्थान परिसरातील एका शेतात अवैधपणे गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ९३ गांजाची झाडे जप्त केली असून, या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता सावदा-फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बैऱ्हम बुवा
देवस्थान परिसरातील गट क्रमांक ४६३ मधील शेतावर छापा टाकण्यात आला. या शेतात निलेश रमेश पाटील (वय ४०, रा. सावदा) यांनी गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

छाप्यादरम्यान शेतात ९३ गांजाची झाडे मिळून आली. पोलिसांनी ही सर्व झाडे जप्त केली असून कषी अधिकारी राजेंद्र कोंडे, नायब तहसीलदार गणेश साळी, तलाठी रशीद तडवी आणि मुक्ताईनगर येथील फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ९४ हजार ७२ रुपये इतकी आहे (एकूण वजन सुमारे २८ किलो ५४० ग्रॅम).

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सानप, तहसील प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि सावदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस संजय चौधरी, राजेंद्र वैदकर, निलेश बाविस्कर, सुनील शेंदाळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज तडवी, बबन तडवी यांच्यासह गुरुरक्षक जवानांनी सहभाग घेतला. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपीविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!