भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

मक्का-मदिना येथे हज यात्रेत, ९८ भारतीयांचा मृत्यू, त्यात जळगाव जिल्ह्यातील  दोन समावेश

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मक्का-मदिना येथे हज यात्रे साठी गेलेल्या ११५० हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इजिप्तमध्ये सर्वाधिक ६५८ आहेत. यानंतर इंडोनेशियाचे १९९ आणि भारताचे ९८ आहेत. जॉर्डनमधील ७५, ट्युनिशियातील ४९, पाकिस्तानमधील ३५ आणि इराणमधील ११ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात सौदी अरेबिया मध्ये हज यात्रेसाठी गेलेल्या जळगाव येथील दोन जणांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

उच्चांकी तापमानामुळे गेल्या आठवड्यात अनेक भाविकांना प्राण गमवावे लागले होते दरम्यान सौदी अरबच्या मक्का-मदिना येथे पवित्र हज यात्रेसाठी गेलेल्या जळगाव शहरातील शिवाजीनगरच्या मागील उस्मानिया पार्क, अली मियानगर येथे डॉ. उमर देशमुख यांचे कुटुंबातील त्यांचे वडील अब्दुल रफिक देशमुख (वय ६५), आई शाहीन बेगम अब्दुल रफिक देशमुख (६१) हे दोघे हज यात्रेसाठी गेले होते. मीना शहरात असताना उच्चांकी तापमानामुळे शाहीन बेगम यांची प्रकृती खराब झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

तर पिंप्राळा हुडको भागातील गुलशन रजा कॉलनीत राहणारे अजमल खान अफजल खान (वय ५४) हे पत्नी शबानाबी खान यांच्यासह हज यात्रेला गेले होते. अजमल खान सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील नॅशनल ऊर्दू हायस्कूलचे शिक्षक आहेत. सौदी अरेबिया येथे मीना परिसरात त्यांना चक्कर आली. त्याठिकाणी काही वेळ पत्नी शबानाबी यांच्यापासून त्यांची ताटातूट झाली. मात्र, थोड्या वेळाने शबानाबी यांना शोधत असताना अजमल खान यांना चक्कर आल्यावर त्यांची प्रकृती खालावली. वेळीच उपचार न मिळाल्याने अजमल खान यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!