मुक्ताईनगर पोलिसांनी ८ दरोडेखोर पकडले; मात्र चर्चेला उधाण जुगार अड्ड्यावर बंदूकधाऱ्यांकडून दरोडा पडल्याच्या ?
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क |
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | मुक्ताईनगर पोलिसांकडून काल ८ दरोडेखोराना जेरबंद करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत असून जामनेर ते बोदवड रस्त्यावरील एका हॉटेल/ढाब्यावर चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बंदूकधारी दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखोंची लूट करून बोदवड मुक्ताईनगर मार्गे बऱ्हाणपूर कडे पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे बोलले जात असून तशी चर्चा परिसरात रंगत आहे.
याबाबत मुक्ताईनगर पोलिसस्टेशनला चौकशी केली असता, दरोड्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर शहराकडे एक गाडी येतं असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाल्यानंतर त्यांनी बोदवडकडून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश पथकाला दिले असता त्या प्रमाणे नाकाबंदी टिमने एक पांढ – या रंगाची इरटीगा गाडी क्र. MH – 46A – 8521 ही थांबवली. त्यातील इसमांना पोलीस ठाणे येथे आणुन त्यांची आणी वाहनाची झडती घेतली असता ८ इसम आणी गावठी कट्टा काडतूसह मुद्देमाल मिळुन आले असे पोलीसांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात घटनेच्या दिवशी मुक्ताईनगरचे डीवायएसपी राजकुमार शिंदे यांनी “मंडे टू मंडे न्युज” शी बोलताना ढाब्यावर चोरी झाल्याची माहिती त्यांनी दिली होती परंतु, यावर जुगार अड्ड्यावर दरोडा पडला असल्याचा प्रश्न केला असता त्यांनी याबाबत मला माहिती नसल्याचे सांगत शिंदे यांनी जास्त बोलणे टाळले होते.
पोलीस प्रशासनाकडून दिशाभूल..? परिसरात चर्चा…— दरम्यान, याप्रकरणाची तालुक्यांत वेगळीच चर्चा असून पोलीस प्रशासनाकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचे परिसरात बोलले जात आहे. परिसरात अशी चर्चा आहे की, संबंधित टोळके हे जामनेर ते बोदवड रस्त्यावर एका ढाब्यावर पत्त्याच्या क्लब सुरू होता तिथे असलेल्या लोकांच्या कानफाटावर बंदू लावत 8 ते 10 लाख रु रक्कम घेऊन प्रसार झाले होते त्यामुळे क्लब चालकांनी जामनेर पोलीस यांना संपर्क केला असता त्यांनी लागलीच बोदवड पोलिसांना कळविले परंतु सदर ईरटीगा गाडी ही मुक्ताईनगर च्या दिशेने आल्याने त्यांनी पुन्हा मुक्ताईनगर पोलिसांना या संदर्भात कळविले त्यामुळे मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल जाळे टाकून मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर गाडी अडवून आठ जणांना ताब्यात घेतले. असे परीसरात बोलले जात असून तशी चर्चा परिसरात रंगत आहे. त्या दरम्यान या लुटीत त्यांच्याजवळ आठ ते दहा लाख रुपये होते की जास्त होती ? बोदवड कडून येताना मुक्ताईनगरच्या रस्त्यामध्ये फेकले की नेमके पैसे कसे गायब झाले ? अशी चर्चा देखील होत आहे तेव्हा त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा काही रक्कम व सुरा मोबाईल तसेच नंबर प्लेट आढळून आल्याची चर्चा आहे. घटनेच्या दिवशी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जामनेर व बोदवड येथिल वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांसह टीम उपस्थित असल्याची ही चर्चा आहे. दरम्यान सदर टोळक्याने क्लब वरून लाखोंची रक्कम चोरली होती ? नेमकी ती रक्कम किती होती ? या प्रकारात लाखोंची रक्कम लाटणारे कोण ? रक्कम लाटल्याच्या चर्चेसही उधाण आले आहे.
या पूर्वी असाच सेम प्रकार महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर रावेर तालुक्यातील चोरवड येथे अशाच प्रकारे बऱ्हाणपूर येथून आलेल्या बंदूकधारी दरोडेखोरांनी चोरवड येथे अवैध सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्यांवर बंदूक रोखून दरोडा टाकला होता. व मोठी लूट केली होती. त्यानंतर रावेर तालुक्यांतील सावदा येथिल सावदा – रावेर रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्याच्या क्लब वर रात्री मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील सुमारे दहा ते बारा लोकानी दरोडा टाकत मोबाईलसह रक्कम लांबवली होती. दरम्यान दरोडेखोरांनी हिसकावलेले मोबाईल त्यांनी कुणाच्या तरी मध्यस्तिने दोन दिवसानंतर परत देखील केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
मुक्ताईनगर पोलीसांनी याप्रकरणात 1 ) मुकेस फकीरा गणेश वय -42 रा . बखारी जय भिमवाडी शहापुर जि . बुरहानपुर राज्य – मध्य प्रदेश 02 ) शेख भुरा शेख बशिर वय 38 रा.शहापुर वॉर्ड क्रं .5 छोटा बाजार जि . बुरहानपुर राज्य – मध्य प्रदेश 03 ) शेख शरीफ शेख सलीम वय 35 रा.इच्छापुर बाजार गल्ली मशिद चे पाठीमागे जि . बुरहानपुर राज्य – मध्य प्रदेश 04 ) शाहरुख शहा चांद शहा वय 20 रा. आगननाका उजैन्न राज्य – मध्य प्रदेश 05 ) अज्जु उर्फ अझरुदीन शेख अमिनुद्दीन वय 36 विरन कॉलनी 13 नंबर गल्ली अमीनपुरा बुरहानपुर राज्य – मध्य प्रदेश 06 ) अंकुश तुळशिराम चव्हाण वय 20 रा . खापरखेडा तहसिल खकणार जि. बुरहानपुर राज्य – मध्य प्रदेश 07 ) खजेंदरसिंग कुलबिरसिंग रिन वय 40 रा.लोधीपुरा बुरहानपुर राज्य – मध्य प्रदेश 08 ) शेख नईम शेख कय्युम वय 45 रा. शहापुर वॉर्ड क्रं . 5 छोटाबाजार तहसिल कार्यालय जवळ बुरहानपुर राज्य – मध्य प्रदेश या आरोपींना ताब्यांत घेतले आहे.
मिळालेला मुद्देमाल– 1 ) रु .69,650 / – रोख रक्कम, 2 ) रु .40,000 / – किमतीचा एक गावठी कट्टा, 3 ) रु .1500 / – कि . चा तिन जिवंत काडतुस, 4 ) रु .1500 / – सुरा, 5 ) रु .6,77,750 कि.ची इरटीगा गाडी, 6 ) रु .41,500 कि . चे 06 मोबाईल फोन, 7 ) रु .50 / – कि.ची. सुती दोरी, 8 ) रु .200 / – कि.च्या दोन नंबर प्लेट मुदेमाल मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. वरील इसमांना अटक करुन त्यांचे विरुध्द CCTNS No- 307/2023 भादवि कलम 399 , 402 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 , 4/25 , मपोका कलम 37 ( 1 ) ( 3 ) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक जळगांव एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहीते, सपोनी संदिप दुनगहु, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. राहुल बोरकर पोहेकॉ विनोद सोनवणे, पोहेकॉ संदिप खंडारे, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोना संदीप वानखेडे पोका राहुल बेहनवाल, पोकॉसंदिप धनगर, पोकों रविंद्र धनगर, पोकॉ मंगल सोळंके, पोकों अमोल जाधव यांनी केलेली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा