पत्रकारांनी बातमी न लावता सहकार्य केले, तुम्ही बातमी लावायला नको होती, प्रसिद्धी माध्यमांना आत्मचिंतन करणारी सूचना !
सुरेश पाटील,
यावल (प्रतिनिधी)। यावल शहरातील इतर पत्रकारांनी बातमी न लावता आम्हाला सहकार्य केले, तुम्ही सुद्धा बातमी लावायला नको होती तसेच बातमी ऑन लाईन प्रसिद्धी करायला नको होती, अशी आत्मचिंतन करणारी नम्र सूचना यावल शहरातील एका प्रतिनिधीस शहरातील काही प्रतिनिधी समक्ष एकाने काल दिनांक 18 शनिवार रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या दरम्यान दिली आहे.
गेल्या पाच ते सात दिवसात यावल तालुक्यातील अवैध सावकारी संदर्भात तसेच काल दिनांक 18 जुलै 2020 शनिवार रोजी वृत्त पत्रातुन तसेच ऑनलाइन माध्यमातून आदिवासी शेतकऱ्याची लाखो रुपयांची शेती सावकाराच्या कब्जात पोलिसांच्या साक्षीने तक्रारदारास ट्रॅक्टर परत असे वृत्त प्रसिद्ध झाले होते आणि आहे या वृत्तामुळे तसेच अवैध सावकारी संदर्भात वस्तुस्थिती जन्य वृत्त प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण यावल तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. तसेच सावकारी संदर्भातील एका प्रकरणात आरपीआय ( आठवले गट ) जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सुर्यवंशी यांनी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना लेखी निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती आणि आहे आणि याच संदर्भात शहरातील सर्व पत्रकारांना एकाच वेळेला राजुभाऊ यांनी प्रसिद्धीसाठी निवेदन दिले होते आणि आहे. काही वृत्तपत्रातून तसेच ऑनलाइन माध्यमातून निवेदन संबंधित बातमी प्रसिद्ध झाली तर काही दैनिकातून प्रसिद्ध झालेली नाही.
ज्या वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाली नाही त्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी आम्हाला सहकार्य केले त्याप्रमाणे तुम्ही पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होते अशी नम्रवजा सूचना सावकारा संबंधित एकाने प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधी समक्ष एका प्रतिनिधीला दिल्याने लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणाऱ्या यावल शहरातील पत्रकारिते संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच पत्रकारिता ही वस्तुस्थिती जन्य तसेच कायदा सांभाळून, अन्याय अत्याचारा संदर्भात लेखी निवेदनाचा आधारावर तक्रारीनुसार आणि समाज हिताच्या दृष्टीने निर्भीडपणे आवाज उठवणारी पाहिजे असे यावल शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे.