भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्या

निशाण्यावर चीन, भारत अमेरिकेकडून विशेष प्रकारचे तोफगोळे घेणार

चीनला उत्तर देण्यासाठी भारतानेही एका बाजूला चर्चा सुरू ठेवण्यासह दुसरीकडे लष्करी क्षमता वाढवण्याची तयारी केली आहे. चीनने लडाखमध्ये भारतीय सीमेला लागून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि तोफा तैनात केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अचून आणि लांब पल्ल्याचा मारा करणारे तोफगोळे खरेदी करण्याची योजना बनवण्यात येत आहे. यासाठी अमेरिकेशी संपर्कही साधण्यात आला आहे.

नवी दिल्लीः

लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर (India China Conflict) तणाव असताना भारताने वेगाने संरक्षण तयारी सुरू केली आहे. चीन सीमेवरील (LAC) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशिया दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी लेहमध्ये आहेत. चिनी सैनिकांशी संघर्षात जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली. या दरम्यान, भारताने एम-777 (Ultra Light Howitzers) हॉवित्झर तोफांसाठी विशेष प्रकारचे तोफगोळे खरेदी करण्यासाठी अमेरिकेशी संपर्क साधला आहे. चीनला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तायारी सुरू केली.

शस्त्रास्त्रांची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सैन्याला महत्त्वाच्या ५०० कोटींच्या सामग्रीच्या खरेदीची परवानगी दिली. अचूक मारा आणि तोफखान्यासाठी उत्तम प्रकारे बनवण्यात आलेले तोफगोळे खरेदी करण्याची योजना बनण्यात येत आहे. ५० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले तोफगोळे घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असं एएनआयने म्हटलंय.

अल्ट्रा हॉवित्झर तोफा

शत्रूवर जबदस्त प्रहार करण्याची क्षमता असलेल्या अल्ट्रा हॉवित्झर तोफा गेल्या वर्षीच लष्करात दाखल करण्यात आल्या. चीन सीमेवरील तणाव पाहता सैन्य दलांना आर्थिक ताकद देण्यात आली आहे. आता अल्ट्रा हॉवित्झर तोफांसाठी ज्यादा मारक क्षमता असलेल्या तोफगोळ्यांच्या खरेदीचे आदेश देण्याची योजना आहे. उंच आणि डोंगराळ भागात या तोफा सहज तैनात करता येऊ शकतात.

भारत-चीन तणाव; सर्वेक्षणात देशाच्या सुरक्षेवर ७२ टक्के नागरिकांचा PM मोदींवर विश्वास  :

अचूक मारा करणारी

अल्ट्रा हॉवित्झर तोफा या गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लष्करात दाखल करण्यात आल्या. अचूक लक्ष्य टिपणं हे या तोफांचं वैशिष्ट्य आहे. चीनकडून सतत एलएसीवर चिथावणीखोर हालचाली करण्यात येत आहेत. तसंच सैन्य शक्ती वाढवली जात आहे. शस्त्रास्त्रही तैनात केली जात आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ तिबेट आणि सीमा भागांमध्ये चीने आपल्या तोफा आणि शस्रास्त्र तैनात केली आहेत.

भारत-अमेरिकेत झाला होता करार

एम-777 हॉवित्झर तोफांच्या निर्मितीसाठी भारत आणि अमेरिकेत करार झाला होता. ७० कोटी अमेरिकी डॉलरची ही डील नोव्हेंबर २०१६मध्ये करण्यात आली होती. एम-777 हॉवित्झर तोफ ही जगातील सर्वोत्तम तोफांपैकी एक आहे. इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धात या तोफांचा वापर अमेरिकेने केला होता. या तोफांना चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर उंच ठिकाणी तैनात केल्या जाणार आहेत. ही तोफ चिनॉक हेलिकॉप्टरद्वारे सहज कुठेही नेता येऊ शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!