यावल तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीस पळविले
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीस फुस लावून पळवून नेल्याची घटना १३ जून रोजी उघडकीस आली.
यावल तालुक्यातील पाडळसा गावा जवळील विट भट्टीवर विटा थापण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली.
सदरचा प्रकार लक्षात आल्या नंतर मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला.
परंतु मुलगी मात्र कोठेही मिळून न आल्याने या बाबत फैजपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून फैजपूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस उप निरीक्षक मोयुनोद्दिन सैय्यद हे करीत आहेत.