क्राईमनाशिक

पुन्हा बनावट नोटा सापडल्याने मोठी खळबळ

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कालच नाशिकमधून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन महिलांकडून या बनावट नोटा चलनात आणले जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. 

नाशिकरोड परिसरात दोन महिला ५०० रुपयांच्या १० हजारांच्या बनावट नोटा चलनात आणत असताना पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचा मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय सलग दोन दिवस कारवाई झाली असताना या टोळीने आणखी किती नोटा चलनात आणल्या असतील हे सांगणे कठीण आहे.

नाशिकच्या अंबड पोलिसांनी कालच कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. हि टोळी शहरातील एका हॉटेलमध्ये नोटा छापण्याचे काम करत होते. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असता अंबड हद्दीतुन २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी या सर्व नोटा जप्त केल्या होत्या. यानंतर आज नाशिकरोड परिसरात ५०० रुपयांचा बनावट नोटा चलनात आणताना दोन महिला आढळून आल्या आहेत. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!