भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, यावल तालुक्यातील घटना

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील शिपाई बाळू पाटील हे जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून दुचाकीने परत येत असताना त्यांना यावल तालुक्यातील बामणोद गावा जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या एमएच १९ बीएच १३२६ या
दुचाकीला भीषण धडक दिली. यात दुचाकीस्वार असलेल्या शिपायाचा जागीच मृत्यू झाला आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा येथील बाळू काळू पाटील (वय ५५ वर्ष. रा. हिंगोणा ता. यावल) हे यावल तहसीलदार कार्यालय, यावल येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. शुक्रवार दि. २० रोजी बाळू काळू पाटील हे यावल येथून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी शासकीय कामानिमित्त गेले होते. तेथून फैजपूर प्रांत कार्यलयातील टपाल घेऊन भुसावळमार्गे परत येत असताना बामणोद गावाजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या (एमएच १९ बीएच १३२६) या दुचाकीला जोरदार धडक दिली. या
धडकेत बाळू पाटील हे रस्त्यावर फेकले जाऊन जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार असून  या घटने प्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीनआहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!