क्राईमजळगाव

५० रुपयांची लाच महागात पडली, पैसे घेतांनाचा व्हिडिओ व्हायलर, अखेर “ते” तीन वाहतूक पोलिस निलंबित

जळगाव. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पन्नास रुपयांची लाच घेण पोलिसांना भलतीच महागात पडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे घडली. ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्यातील पवन पाटील, चेतन सोनवणे, गुलाबराव मनोरे या  तीन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

वाहतूक पोलीस पवन पाटील एका ट्रक चालकाकडून ५० रूपये घेत असल्याचा व्हिडिओ  सोशल मीडियावर तुफान  व्हायलर झाला. या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून पवन पाटील यांना निलंबित केले. या घटनेच्या प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी ट्रकचालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओमध्ये आणखी दोन वाहतूक पोलीस कर्मचारी चेतन सोनवणे आणि गुलाबराव मनोरे हेही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!