Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावधरणगाव

विद्यार्थी व प्रवाशांनी खच्चून भरलेली बस धडकली इलेक्ट्रिक खांब्यावर…जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज दि. १३ डिसेंबर शुक्रवार रोजी विद्यार्थी व प्रवाशांनी खाच्चून भरलेल्या बस वरील ताबा सुटल्याने बस इलेक्ट्रिक खांब्यावर धडकली. यात प्रवाश्यांसह शालेय विद्यार्थी असे ३१ जण जखमी झाले.ही घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात घडली.

मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक (एमएच १४ बीटी २८८७) नेहमीप्रमाणे शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोनगावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील (वय-५६, रा.लाडली ता.धरणगाव) यांचा बसवरील ताबा सुटल्याने बस वळणावरील इलेक्ट्रिक खांब्याला धडकली. ही घटना सकाळी सहा वाजता घडली. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच जवळीलच लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार झाल्यावर बसने विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घराकडे सोडल्याची माहिती मिळाली.

यात जखमीं झालेल्या विद्यार्थ्यांची व प्रवाशांची नावे
मयुरी पाटील (वय-१४), आधार सोनवणे (वय-४५), लावण्या सोनवणे (वय-११), सायली पाटील (वय-१५) हर्षा पाटील (वय-१३), गुंजन सपकाळे (वय-१६), जनाबाई पाटील (वय-५५), अजय पाटील (वय-१३), कुंदन पवार (वय-१३), सुनीता भिल (वय-४६), काजल पाटील (वय-१५), मोहिनी शारद पाटील (वय-१७), भावना शांताराम पाटील (वय-१६),अशोक जगन पाटील (वय-५७), बालाजी शंकर शिरसाट (वय-५३), कुणाल गुंजाळ पवार (वय-१३), रेखाबाई विशाल दांडेकर (वय-२५ ) जगन भीमराव पवार (वय-४२), विश्वनाथ सदाशिव पाटील (वय -७१), निखिल सुधाकर पाटील (वय-२३), तन्मय मंगल पाटील (वय-१९), गुंजन सुनील पाटील (वय १४), विवेक छगन पाटील (वय -१७), राम शरद अवचिते (वय-१३), जयेश चंद्रकांत पाटील (वय-१६), सायली सुरेश पाटील (वय-१७) प्रांजल संदीप पाटील (वय १४), चेतना संभाजी पाटील (वय १३) कीर्ती शांताराम सपकाळे (वय १५) सर्व रा. रेल ता.धरणगाव), जिजाबाई पंढरीनाथ पाटील (वय-६२), पंढरीनाथ आत्माराम पाटील (वय-६७, दोन्ही रा. लाडली ता. धरणगाव),  असे एकूण ३१ जण जखमी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!