भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यातील सहा विज चोरांवर गुन्हा दाखल

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील वीज चोरी करणाऱ्या वीज चोरांवर वीज वितरण कंपनीने कारवाई केली आहे. कोळवद येथे महावितरण कंपनीच्या ग्रामीण कक्षाचे सहायक अभियंता यांच्या नेतृत्वात वीजचोरी विरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली होती. यावल तालुक्यातील कोळवद येथे वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांनी मागील एक वर्षापासून १ हजार २८६ युनिट वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना एकूण २२ हजार रुपये अशी आकारणी करून दंड भरण्याची नोटीस बजविण्यात आली होती.

यावल तालुक्यातील कोळवद येथील नथ्थू फत्तू तडवी, संजय रवींद्र सूर्यवंशी, सुभाष कमलाकर फेगडे, रमजान फकीरा तडवी, महारू उस्मान तडवी व भास्कर आत्माराम पाटील हे सहा जण वीजचोरी करताना आढळून आले होते. दरम्यान, या सहा जणांनी वेळेत दंड भरला नाही. म्हणून यावल पोलिस स्टेशनला सहा. अभियंता दीपक चौधरी यांच्या फिर्यादी वरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!