अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, विनयभंगाचा गुन्हा दाखल
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अल्पवयीन मुलीला पाणी मागण्याचा बहाणा करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ तालुक्यातील एका गावात १४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यात राहाते. तिच्या घरात काम करणारा पेंटर सतीश भीमराव बिऱ्हाडे रा. भुसावळ. याने शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी वाजेच्या सुमारास मुलीला एकटी पाहून पिण्यास पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्या सोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.
घडलेली घटना मुलीने तिच्या आईस सांगितल्याने पीडित मुलीच्या आईने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून आरोपी सतीश भीमराव बिऱ्हाडे. रा. भुसावळ यांचेवर रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि नंदकिशोर काळे हे पुढील तपास करीत आहेत.