अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे तीन संशयित आरोपींवर विनयभंग व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींनी वेळोवेळी पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. त्यामुळे संशयित मारुफ शेख मणियार, मारुफ शेख रऊफ, रिजवान शेख मणियार (सर्व रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) यांच्या विरुद्ध नशिराबाद येथे राहणाऱ्या एका १५ वर्षीय तरुणीने रविवारी दि. २ जून रोजी तक्रार दखल केली. या बाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला तिघांविरोधात विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नशिराबाद पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश घायतड हे तपास करीत आहेत.