क्राईमयावल

अट्रॉवल मुंजोबाच्या यात्रेला जाणाऱ्या रिक्षाला चारचाकी वाहनाची जोरदार धडक

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील  अट्रॉवल  येथे दरवर्षी मोठी मुंजोबाची यात्रा भरत असते. “अट्रॉवलचा  मुंजोबा” परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दूरदूरहून या यात्रेला मुंजोबाच्या दर्शनानिमित्त भाविक येत असतात. जळगाव येथून भुसावळ मार्गे अट्रॉवल येथे
मुंजोबाच्या यात्रेला येणाऱ्या प्रवासी रिक्षाला अपघात झाला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची घटना दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव प्रकाश कडू घुले (वय ६५, राजी. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह
रिक्षा क्रमांक MH 19 V 7196.ने यावल तालुक्यातील अट्रॉवल येथे मुंजोबाच्या यात्रेसाठी जात होते. दरम्यान, भुसावळ येथून पुढे बामणोद ते भालोद रस्त्यावरील वळणावर त्यांच्या रिक्षाला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक MH 19 DJ 1357 ने जोरदार धडक दिली. या अपघातात धनुष सुनील घुले (वय ५), अर्चना सुनील घुले (वय २८), कमल लक्ष्मण घुले, सविता अनिल घुले आणि वैष्णवी अनिल घुले (सर्व रा. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी लागलीच अपघात स्थळी धाव घेत जखमींना तात्काल जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

या संदर्भात प्रकाश घुले यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या नुसार चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकावर फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!