दहावीच्या परीक्षेत सावदा आ.ग. हायस्कूलचे घवघवीत यश
सावदा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज. प्रतिनिधी |
फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वी चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज 13/05/2025 रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहिर झाला असून त्यानुसार श्री. आ. गं हायस्कूल सावदा विद्यालयाचा निकाल खालील प्रमाणे जाहिर करण्यात आला आहे.
प्रथम क्रमांक :- चौधरी तनेश अशोक (88.80 टक्के)
द्वितीय क्रमांक :- चौधरी पार्थ अनिल (86.60 टक्के) मिळवून उत्तीर्ण झाले आहे. परीक्षेसाठी एकूण प्रविष्ठ विद्यार्थी 72 होते त्यापैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयाचा एकूण शेकडा निकाल शेकडा 88.88 एवढा लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सावदा न.पा. प्रशासक तथा प्रांतअधिकारी बबनराव काकडे, मुख्याधिकारी भूषण वर्मा, शिक्षणाधिकारी विलास कोळी,सर्व माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, मुख्याध्यापक प्रकाश गणू भालेराव, पर्यवेक्षक, वाय.एन. पाटील, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.