यावल येथील उच्च शिक्षित तरुणाची दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल येथील रहिवासी उच्च शिक्षित तरुणाने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि. १७ जून सोमवार रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील महाजन गल्लीत घडली.
अक्षय प्रमोद करांडे (वय २७, रा. महाजन गल्ली, यावल) हा उच्च शिक्षित तरुण पुणे येथे एका कंपनीत सॉप्टवेअर इंजिनिअर अभियंता म्हणून नोकरीला होता. अक्षय करांडे या तरूणाने १७ जुन रोजी रात्री ८ ते ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या महाजन गल्लीतील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक्षय यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यास रात्री तात्काळ उपचारासाठी भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.अक्षय च्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अक्षयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथे ट्रामा सेंटर मध्ये करण्यात आले.