भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

एक हनी ट्रॅप असाही… उद्योजकाला मागितले ६१ लाख, पत्नीसोबत प्रेमसंबंधाचा केला बनाव

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नांदेड: इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मालकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

त्यानंतरही कंपनी मालकाला पुन्हा 50 लाखांची मागणी करून रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईताला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप करून बदनामी करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आणखी ६१ लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत खंडणीखोराला बेड्या ठोकण्यात आल्या. हनी ट्रॅपचा हा मोठा प्रकार खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून उघडकीस आणला आहे. अविनाश वसंत जाधव (२८, दत्तनगर, कात्रज, पुणे) असे खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. फिर्यादींची इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याची कंपनी आहे. त्याच कार्यालयात आरोपी आणि आरोपीची पत्नी लग्नापूर्वी कामाला होते.

जाधव याची पत्नी तेथे सुपरवायझर म्हणून नोकरीस होती. तेथेच जाधवचे आणि तरुणीचे प्रेमसंबंध जुळले होते. २०१७ मध्ये फिर्यादीने त्यांच्या लग्नासाठी ४० हजार रुपयांची मदत केली होती. परंतु, जाधवच्या पत्नीने कालांतराने काम सोडले. त्यानंतर त्याच्या पत्नीने फिर्यादींना फोन करून अविनाश हा कारागृहामध्ये असल्याचे सांगून २ लाख रुपयांची मदत मागितली होती. त्यामुळे फिर्यादींनी तिला एक लाख रुपयांची मदत केली. २०१८ मध्ये जाधव हा कारागृहातून बाहेर आला. काही दिवसांतच त्याने फिर्यादींना फोन करून “तुमचे माझ्या पत्नीशी प्रेमसंबंध आहेत, तुम्ही रोज गाडीने फिरता, असे म्हणत तुमच्या प्रेमसंबंधाबाबत तुमच्या पत्नीला माहिती देताे,’ अशी धमकी दिली.

त्यानंतर त्याने वेळोवेळी फिर्यादीकडून याच कारणास्तव २० लाखांची खंडणी उकळली. त्यामुळे घाबरून तक्रारदाराने अविनाशला वेळोवेळी मिळून 20 लाख दिले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अविनाशने पुन्हा तक्रारदाराला फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अविनाशला 2 लाख रुपये घेताना ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकाकडून आतापर्यंत 20 लाख रूपयांची खंडणी घेतल्याची कबुली दिली. अविनाश सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याच्याविरूद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, पांडुरंग वांजळे, सचिन अहिवळे, जगदाळे, शिंनगारे यांच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!