स्वतः च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या वासनांध बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आपल्याच १६ वर्षाच्या मुलीवर
४५ वर्षीय वासनांध पित्याने बलात्कार केला. नंतर तिला धमकी देवून चुपचापही केले होते. परंतु या नराधमाचे दुष्कृत्य मुलीला गर्भधारणा झाल्यामुळे उघड झाले आणि नंतर कायद्याने पीडित मुलीला न्याय दिला. विशेष सत्र न्यायाधीश आर.एन. मेहरे यांनी ३ जुलै रोजी आरोपी शेख शकीलला पोस्को कायद्यातील मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.ही घटना बुलडाणा – चिखली तालुक्यातील
आहे. शेख शकील असं आरोपी पित्याच नाव असून तो वळती गावचा रहिवाशी आहे.
मोलमजुरी करून घर चालविणारा शेख शकील वळती मध्ये राहतो. डिसेंबर २०२२ मध्ये मुलीची आई नातेवाइकांकडे गेली होती. या दरम्यान बाहेरून दारू पिवून घरी आलेल्या शकीलने आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तीन महिन्यानंतर, मार्च २०२३ मध्ये पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले. पिडीतेला घेऊन तिच्या आईने चिखली येथील रुग्णालय गाठले. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की, पीडित मुलगी गर्भवती आहे. येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर प्रकरण कायद्याच्या कक्षेतील असल्यामुळे चिखली ठाण्याचे एपीआय प्रवीण तळे यांनी काही सहकाऱ्यांना पीडित मुलगी आणि तिच्या आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र आमच्यावर दबाव आणाल तर आम्ही मुलीचा उपचार करणार नाही, तिला मरू देवू”, अशी भूमिका शकीलच्या कुटुंबाने घेतली. कुटुंबीयांकडूनच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे चिखली पोलिस ठाण्याचे एपीआय तळे यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. तपास एपीआय सविता मोरे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याच दिवशी, २० मार्च २०२३ रोजी या नराधम बापाला अटक करण्यात आली. तत्कालीन बुलडाणा डीवायएसपी सचिन कदम यांनी एपीआय प्रियंका गोरे यांना पीडित मुलीचा ”इन कॅमेरा” जबाब नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानंतर एपीआय गोरे यांनी इन कॅमेरा जबाब घेतला. यावेळी हेकाँ झगरे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
या वडीलच ‘बायोलॉजिकल फादर’ प्रकरणात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले.तसेच डीएनए तपासणीत बाळाची आई पीडिता असून पीडितेचे वडीलच म्हणजे शकीलच त्या बाळाचे ‘बायोलॉजिकल फादर आहे. अॅड. खत्री यांनी प्रबळ युक्तिवाद केला. उपलब्ध तांत्रिक पुरावे, नोंदविलेल्या साक्षी आणि अॅड. संतोष खत्री यांनी जोरदारपणे मांडलेली सरकारी बाजू महत्त्वाची ठरली. आज, बुधवार, ३ जुलै रोजी प्रकरणाचा निकाल लागला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी पोक्सोच्या कलम ६ नुसार शेख शकीलला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोबत ३ हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास तीन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.