भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

तब्बल ३० अधिकाऱ्यांच्या पथकाची मोठी कारवाई, केंद्रीय पणन अधिकारी लाच घेतांना ताब्यात

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयांच्या अखत्यारीतील ‘एगमार्क’ अर्थात एजीमार्कला मंजुरी देणाऱ्या नाशिकच्या पणन कार्यालयातील अधिकारी विशाल तळवलकर याला एक लाख रुपयांची लाच घेतांना सीबीआयच्या-एसबी पथकाने गजाआड केले.

दि. २ सप्टेंबर सोमवार रोजी ही कारवाई नाशिकराेड येथील आनंदनगर भागातील कार्यालयात करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील डेअरी प्राॅडक्ट व्यवसायिकास आवश्यक एगमार्कच्या प्रमाणपत्राची आवश्यकता हाेती. त्यासाठी त्याने नाशिकमधील कार्यालयाकडे अर्ज केला हाेता. तळवलकर व त्याच्या अखत्यारितील लिपिक आणि इतर स्टाफने एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने सीबीआय-एसीबीच्या नाशिक युनिटकडे तक्रार नाेंदविली. सीबीआय एसीबी मुंबई चे आयजी डॉ. सदानंद दाते याचे नेतृत्वाखाली तब्बल ३० अधिकाऱ्यांच्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक रंजित पांडे यांनी सापळा रचून तळवलकर याला रंगेहाथ अटक केली. पुढील तपास सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!